दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल अजून सुद्धा लागलेला नाहीये .बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्याराज्यातील सर्व विभागाचे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे बोर्डाचे पेपर सर्व तपासणी झाले आहे .अशी माहिती SSC HSC बोर्डाकडून मिळाली आहे तर यामुळे असा अंदाज वर्तवला जाऊ शकतो की राज्यामध्ये लवकरात लवकर बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे आणि काही दिवसांपूर्वी राज्याचे शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा अशी माहिती दिली होती की दहावी आणि बारावीचे बोर्डाचे निकाल येत्या पंधरा दिवसांमध्ये जाहीर करण्यात येतील अशी माहिती एका वृत्त वाहिनीशी दिली होती महाराष्ट्र बोर्ड दहावी परीक्षेचा निकाल येत्या 20 जूनपर्यंत लावण्यात येईल आणि बारावीचा निकाल 10 जून पर्यंत जाहीर करण्यात येईल.अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे याबद्दल अशी कुठलीही अधिकृत घोषणा मिळालेली नाही तरीसुद्धा राज्याचे शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या एकूण माहितीवरून याच तारका वर्तवल्या जात आहे .