परभणी शहरातील पांडुरंग सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नव्हाटी तांडा येथील महिला रुग्णावर हृदयाची शस्त्रक्रिया (पेस मेकर) यशस्वीपणे करण्यात आले या रुग्णाचे नाव गुफाबाई पवार वय ६० वर्ष यांच्यावर पांडुरंग सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली गुफाबाई पवार या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या तेव्हा त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये होत्या त्यांच्या हृदयाचे ठोके हे फार कमी होते त्याच रात्री टेम्पररी पेसमेकर मशीन लावून उपचार सुरू केले गुफाबाई यांच्यावर
हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर व्यंकटेश हराळे डॉक्टर सागर चेऊलवार डॉक्टर व्यंकटेश डुब्बेवार डॉक्टर मोहिते, श्रीराम पोरवाल जावेद पठाण सुरज कुकडे प्रसाद कुलकर्णी समीर पठाण यांनी प्रयत्न केले.